महावितरणमध्ये नोकरीची संधी! दहावी पास आणि संगणक ज्ञान असलेल्यांसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती
अहमदनगर, २६ मे २०२४: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Ahmednagar Jobs), अहमदनगर मंडळामध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. ज्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केली आहे आणि त्यांना संगणक चालवता येते अशा उमेदवारांसाठी ही संधी आहे.(Job opportunity in Mahavitran )
पदं आणि रिक्त जागा:
- लाईनमन: 264 (खुले वर्ग) + 14 (अनुसूचित जाती) + 14 (अनुसूचित जमाती)
- कॉम्प्युटर ऑपरेटर: 29 (खुले वर्ग)
शिक्षण क्षेत्रात मोठी भरती! सर्व शिक्षा अभियानांतर्गत 1 लाख 50 हजार शिक्षकांची भरती!
पात्रता:
- वय: १८ ते ३० वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सवलत)
- अहमदनगर जिल्ह्याचा रहिवासी
- शैक्षणिक पात्रता:
- लाइनमन पदासाठी: 10वी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा/ITI वीजतंत्री/तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण
- कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी: 10वी उत्तीर्ण आणि “कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट” परीक्षा उत्तीर्ण
- किमान 55% गुण (खुले वर्ग), 50% गुण (मागासवर्गीय)
अर्ज कसा करावा:
- उमेदवारांनी शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
- आवश्यक कागदपत्रांसह (शाळा सोडल्याचा दाखला, 10वीचे गुणपत्रक, आयटीआय/कॉम्प्युटर ऑपरेटर परीक्षा गुणपत्रके, जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड आणि अप्रेंटीस नोंदणी) 5 आणि 6 जून 2024 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत महावितरण, अहमदनगर मंडळ कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर येथे अर्ज सादर करा.
घरात बसून कमाई! बारामतीमध्ये
महत्वाच्या तारखा:
- ऑनलाइन नोंदणी: आतापासून
- अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख: 6 जून 2024
अधिक माहितीसाठी:
- अधिक्षक अभियंता, महावितरण, अहमदनगर
- पत्ता: विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर – 414001
- फोन:
- पीआरओ क्रमांक: 105