Teachers Recruitmentशिक्षक भरती जुलै-ऑगस्टमध्ये | या तारखेपासून करू शकतात अर्ज !
Teachers Recruitment : यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात शिक्षक भरतीसाठीची अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट परीक्षा) झाल्यानंतर 24 मार्च रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. जवळपास अडीच लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. मात्र परीक्षा झाल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षक भरती (Teachers Recruitment) नेमकी कधी होणार? याची प्रतीक्षा या उमेदवारांना होती. त्यामुळे आता ही शिक्षक भरती 15 मे नंतर संच मान्यता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून (Education Department) समोर आली आहे. त्यासाठी लवकरच शिक्षक भरतीसाठी असलेले पवित्र पोर्टल हे अॅक्टिव्ह होणार आहे.