मुळशी: मुळशी धरणाच्या सांडव्यावरून सायंकाळी ५ वाजता २५०० क्युसेकने विसर्ग
पुणे, मुळशी: मुळशी धरणाच्या सांडव्यावरून सायंकाळी ५ वाजता २५०० क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. या विसर्गामुळे परिसरातील नदी पात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बसवराज मुन्नोळी, हेड-डॅम्स, इस्टेट ॲंड ॲडव्होकसी, टाटा पॉवर, मुळशी यांनी ही माहिती दिली आहे.