राष्ट्रपती पदक विजेते यांची यादी , स्पर्धा परीक्षेसाठी उपुयक्त !

महाराष्ट्र कारागृह विभागातील नऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक (President’s Medal awarded to nine officers and employees of Maharashtra Prisons Department)

महाराष्ट्र कारागृह विभागातील नऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी बजावलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल वर्ष २०२४ साठी राष्ट्रपतींचे सुधार सेवा पदक केंद्रीय गृह विभागाकडून गुरुवारी (ता. २५) जाहीर करण्यात आले आहे.

पोस्ट ऑफिस भरती 2023 : 30041 पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

या नऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:

  • श्री. रुकमाजी भुमन्ना नरोड, तुरुंगाधिकारी श्रेणी-1, अहमदनगर जिल्हा कारागृह
  • श्री सुनील यशवंत पाटील, तुरुंगाधिकारी श्रेणी-1, तळोजा मध्यवर्ती कारागृह
  • श्री. बळीराम पर्वत पाटील, सुभेदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह
  • श्री. सतिष बापुराव गुंगे, सुभेदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह
  • श्री. सुर्यकांत पांडूरंग पाटील, हवालदार, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह
  • श्री. नामदेव संभाजी भोसले, हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह
  • श्री. संतोष रामनाथ जगदाळे, हवालदार, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह
  • श्री. नवनाथ सोपान भोसले, हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह
  • श्री. विठ्ठल श्रीराम उगले, हवालदार, अकोला जिल्हा कारागृह

या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत दाखविलेली सचोटी व कर्तव्याप्रती असलेल्या निष्टेचा एक प्रकारे सन्मान झाला आहे. या पदकांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या कार्याची पावती मिळाली आहे.

कारागृह विभागाचे वतीने मा. श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 तसेच श्री. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (मु.), कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांनी या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

या पदकामुळे कारागृह विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *