Mpsc डेटा लीक प्रकरण , याच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.


विषय:- महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ – प्रवेशप्रमाणबाबत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिध्द होत असल्याची बाब आज रोजी निदर्शनास आली आहे. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. सदर चॅनेलवर प्रसिध्द झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य विदा (डेटा) लिक झालेला नाही, याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसेच सदर चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक विदा उपलब्ध असल्याचा, तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून अशाप्रकारे कोणताही विदा अथवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नाही.

डाउनलोड करण्यासाठी इथे क्लीक करा 

२. आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
३. प्रवेशप्रमाणपत्रे लिक करणाऱ्या चॅनेलच्या अॅडमिनविरुध्द सायबर पोलीसांकडे तक्रार देण्यात आलेली असून प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
४. प्रस्तुत प्रसिध्दीपत्रकाद्वारे उमेदवारांना आश्वस्त करण्यात येते की, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच विषयांकित परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.

Join WhatsApp Group Join Telegram Read Google News
Leave A Reply

Your email address will not be published.